आज दिवसभरात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ४६६ वर

Admin
आज दिवसभरात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ४६६ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल एकूण १३५ नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ९३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून  ३८ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरातील तीन आणि तालुक्यातील एक  असे चार रुग्ण rt-pcr पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्याचप्रमाणे बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण २६ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बारामती शहरातील फलटण रोड कसबा येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण व  सपना नगर बारामती येथील एक रुग्ण असे एकूण चार एंटीजेन  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात बारामती शहरातील सात व ग्रामीण भागातील एक असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत व बारामतीची रुग्ण संख्या ४६६ झालेली आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली
To Top