सोमेश्वर मंदीर परिसर होणार निसर्गरम्य : मंदिर शेजारील दुकामदारांना दिल्या नोटिसा

Admin
सोमेश्वर मंदीर परिसर होणार निसर्गरम्य : मंदिर शेजारील दुकामदारांना दिल्या नोटिसा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सोमेश्वर मंदीर परिसरातील पेढे व पुजासामग्री ची दुकाने बंद आहेत . त्यामुळे विश्वस्त समीतीने सर्व दुकाने ३१ ऑगस्ट च्या आत  काढुन घेण्यासबंधी दुकानदाराना नोटीसा देण्यात आल्या आहेत .
           मंदीर जीर्णोद्धारासाठी  लाखो रुपयांची मदत देणारे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी सहा महिन्यापूर्वी महाशिवरात्रीला मंदीराला भेट दिली असता दुकानांचे स्थलांतर न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती . विश्वस्त समितीने श्री पवार याना उद्घाटनाची तारीख द्या त्वरीत स्थलांतर करतो असे सांगीतले मात्र स्थलांतर सहा महिने उलटुन गेले तरी झालेच नव्हते .
        सोमेश्वर देवस्थान चे पदसिद्ध विश्वस्त सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी बैठक घेऊन विश्वस्ताना मार्गदर्शन केले . त्यानुसार १७ जुलै २०२० रोजी विश्वस्त समितीने बैठक घेवुन ठराव केला.
           त्यानुसार ३१ ऑगस्ट पर्यंत  दुकानदाराना मुदत देण्यात आली. आहे.अनेक ग्रामस्थानी मंदीर परिसरात वृक्षारोपण केले आहे तसेच हि दुकाने निघाल्या नंतर बागबगीचा व परिसर सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. 
विनोद भांडवलकर - अध्यक्ष सोमेश्वर देवस्थान
सोमेश्वर मंदिर शेजारील व्यवसायिकांना स्थलांतरित करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या असून दुकांदारांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.
To Top