आनंदवार्ता.....करंजेपुल येथील दोन्ही कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

Admin
आनंदवार्ता.....करंजेपुल येथील दोन्ही कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील दोन्ही कोरोना रुग्ण आज ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत. 
             करंजेपुल येथील दि २० रोजी एका रुग्णाचा तर दि २१ रोजी एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकावर बारामती हॉस्पिटल तर दुसऱ्यावर रुई ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू होते. आज सकाळी त्याचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल वानेवाडी येथील एकाचा, निंबुत फरांदेनगर येथील एकाचा तर एक चोपडच पांढरवस्ती येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
To Top