तरडोली भागात आठ दिवसापासून बत्ती गुल : पिण्याच्या पाण्याचे हाल

Admin
तरडोली भागात आठ दिवसापासून बत्ती गुल : पिण्याच्या पाण्याचे हाल

मोरगांव : प्रतिनिधी

 तरडोली ता . बारामती  नजीक पवारवाडी येथील  थ्री फेज लाईट  आठ  दिवसापासुन  बंद आहे . तर पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी वाहुन गेल्यामुळे  माणसांना व  जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी ओढ्याचा आधार घ्यावा लागत आहे . 
         सलग पडलेल्या पावसामुळे  मोरगांव परीसरात विद्युत  रोहीत्राचा खेळखंडोबा होत आहे .तरडोली नजीक पवारवाडी येथील  ११ केव्हीचे रोहीत्र  तीन   दिवस बंद होते  .  सध्या सिंगल फेज लाईट सुरु झाली आहे. मात्र  थ्री फेज आठ दिवसापासून बंद आहे . थ्रीफेज लाईटमुळे  विहारीतुन विज पंपाद्वारे  जनावरांना लागणारे पाण्याच्या थेट पाईपलाईन  शेतकऱ्यांनी गोठ्यापर्यत केल्या आहेत  . मात्र थ्री फेज लाईट नसल्याने   येथील शेतकऱ्यांच्या 'धरण पायथ्याशी तर ओढा हाताशी ' असुनही पिण्याच्या पाण्यासाठी ओढा ईतर गावांचा आधार घ्यावा लागत आहे .
         ग्रामपंचायतीची येणारी पिण्याच्या पाण्याची  जलवाहीनी तुकाईनगर येथून वाहून गेली  आहे . यामुळे येथील ग्रामस्थांना  पिण्याचे पाणी   मोरगांव अथवा तरडोली गावठाणातुन मोटार सायकलवर पाणी आणावे लागत आहे . तर  दुभत्या गाईंनासाठी पिण्याचे पाणी बैलगाडीद्वारे  आणावे लागत आहे . जनावरांसाठी कडबाकुटीसाठी लागणारी सिंगल फेज लाईटही तब्बल तीन  दिवस नसल्याची खंत येथील शेतकरी बाबासो पवार यांनी व्यक्त केली . विज वितरण कंपनीचे कर्मचारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची खंत पवार यांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केली . 
To Top