विस्तारीकरणास माझा व कृती समितीचा विरोध असणार नाही : मात्र चुकीच्या व दिशाभुल करणाऱ्या विस्तारीकरणास आमचा विरोध - सतीश काकडे

Admin
विस्तारीकरणास माझा व कृती समितीचा विरोध असणार नाही : मात्र चुकीच्या व दिशाभुल करणाऱ्या विस्तारीकरणास आमचा विरोध - सतीश काकडे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी


श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चुकीचे होत असलेल्या विस्तारीकरणास परवानगी देवु नये म्हणुन
मी साखर आयुक्त व उपमुख्यमंत्री।अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. विस्तारीकरणास माझा व कृती समितीचा काल, आज व भविष्यातही विरोध नव्हता व असणार नाही. परंतु चुकीच्या व दिशाभुल करणाऱ्या
विस्तारीकरणास आमचा कायम विरोध राहणार असे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.   
              काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हनटले आहे.  मागील काही महिन्यांपुर्वी चेअरमन यांनी विस्तारवाढ करण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. परंतु कृती समितीची बाजु अजित पवार यांनी समजुन घेतल्याने विस्तारीकरण स्थगित झाले होते.
परंतु स्व हीत साधण्यासाठी पुन्हा विस्तारीकरण करण्याची चेअरमन घाई का करीत आहेत? का नविन संचालक मंडळामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही का? केवळ कार्यक्षेत्रात जादा उस आहे याचा याऊ केला आहे. त्यासाठी।फक्त विस्तारीकरण हा केवळ एकच पर्याय आहे का? जादा उस उपलब्ध अनेक वेळा झाला आहे. मागे दोन वेळा आपल्या कारखान्याची रिकव्हरी जादा असतानाही तोटा खावुन बाहेरील कारखान्यांना याच चेअरमन यांनी उस दिला होताच की निदान चालु वर्षी तरी किमान तोटा न खाता बाहेरील कारखान्यांना उस द्यावा.    
               तसेच नविन संचालक मंडळ येईल त्यावेळी विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेता येईल. आत्ता जरी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला तरी त्याचा उपयोग चालु वर्षी होणार नाही मग घाई कशासाठी? पण चुकीचे विस्तारीकरण करून कारखाना भविष्यात तोट्यात घालुन चेअरमन यांना काय मिळवायचे आहे का? चेअरमन यांनी काही दिवसांपुर्वी वर्तमान पत्रामधुन काही मुद्दे मांडले होते त्याचा खुलासा करणे गरजेचे वाटते. भांडवली खर्च किती करावयाचा यासाठी वार्षिक सभेत अंदाजपत्रक ठेवावे लागते, कामांसाठी लागणारे पैसे कोठुन उपलब्ध होणार याची माहिती सादर करावी लागते. परंतु चेअरमन यांनी हे सगळे नियम धाब्यावर बसवुन जास्तीत जास्त कामे गरज नसताना केली आहेत व करीत आहेत.इमारती बांधकाम करण्यासाठी ७ कोटी ५० लाख रूपयांचे कर्ज कोणी कालले याचा खुलासा का केला नाही? आत्मनिर्भर भारत योजनेतुन १२ कोटी रूपये कर्ज कोणत्या कारणासाठी काढले याचा खुलासा का केला नाही? पुर्व हंगामी कामासाठी २५ कोटी रूपये कर्ज का काढले? तसेच अजुन नियोजीत ७२ कोटी रूपयांची विस्तारवाढ पुर्ण।करून विश्रांती घेण्याच्या तयारीत दिसतात. परंतु चेअरमन यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे ५० ते ६० कोटी रूपयांची
भांडवली कामे करून अजुन १०० कोटी रूपये कर्ज काढुन भाडवली खर्च करणे कितपत योग्य आहे. याचा विचार।केला पहिजे की नाही? हे सभासदांनी समजुन घ्यावे.
             कृती समितीच्या म्हणण्या प्रमाणे सन २०१९-२० चा अंतिम उस दर व्यवहाराने ४००/- रू. प्रती मे.टन।जादा निघत होता. परंतु चेअरमन यांनी जुलै २०२० मध्येच साखर आयुक्त यांना ३०००/- रू. प्रति मे.टन भाव।बसत आहे असे कळविले होते. (ल्याचा पुरावा सुध्दा माझ्याकडे आहे) कारण चेअरमन यांना उर्वरित अंदाजे ४० कोटी।रूपये रक्कम त्यांचा कार्यकाळ सपण्या आगोदर नियोजीत विस्तारवादीच्या कामांची बिले व अॅडव्हान्स देण्यासाठी।वापरायचे असल्याने ठेवलेले आहेत. तसेच कामगारांनी मागील पाच ते सात वर्षात कारखाना खऱ्या अर्थाने प्रगती।पथावर आणला त्याच कामगारांना मातीत गाडण्याचे काम चेअरमन यांनी केलेले आहे. कारण साखरवाडी सारखा
कारखाना कर्ज बाजारी होवुन बंद झाला होता तरी ही व्यवस्थापकांनी त्यावेळी कामगारांना १९ टक्के बोनस देवुन कारखाना चालु केला. परंतु चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे एक नंबर असलेल्या आपल्या कारखान्याने कामगारांना मात्र १५ टक्केच बोनस देवुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोणताही साखर कारखाना त्याच्या गाळप क्षमतेपेक्षा विस्तारवाद करीत असताना १८ ते २२ टक्के अधिक क्षमतेने गाळप होईल अशा पध्दतीने विस्तारवाद करीत असतो.
To Top