पोलीस वेशात दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात : वडगाव निंबाळकर पोलिसांची महत्वाची कामगिरी
बारामती : प्रतिनिधी
पोलीसांच्या वेषात येवून पिस्टलचा धाक दाखवून , गोळीबार करून गुन्हा करणारे लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलीसांच्या जाळ्यात ” दि . ०६ ऑगस्ट २०२० रोजी राजगड पो.स्टे.हद्दीतील कापुरहोळ येथे फिर्यादी.संजय किसन निकम यांचे बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये ५ आरोपी आले तेव्हा त्यांचेपैकी १ आरोपी हा पोलीस उप निरीक्षकाचे गणवेशात , १ आरोपी पोलीस नाईकचे गणवेशात , २ खाजगी गणवेशात व १ आरोपी असल्याचे भासविले तसेच बनावट पोलीस गणवेशात आलेल्या आरोपींनी तुम्ही चोरांकडून ७ ग्रॅम सोने घेतले आहे ते सोने परत देता का , आमचेसोबत पुण्याला येता असे म्हणून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुकानातील ३४.५ तोळे सोन्याचे दागिने , १ मोबाईल फोन असा एकुण १७ लाख,३२,हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता तसेच नागरीकांना आरोपींचा संशय आल्यानंतर लोक त्यांना पकडण्यास गेले असता आरोपींनी नागरीकांचे दिशेने गोळीबार करून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला होता . त्याबाबत राजगड पो.स्टे येथे गुन्हा दाखल होता व . दि . ०८/०७/२०२० रोजी जेजुरी पो.स्टे . हद्दीतील निरा गावातील भैरवनाथ एजन्सी चितळे शॉपी येथील दुकानातून पाण्याचे बाटली मागण्याचा बहाणा करून चार अनोळखी इसमानी फिर्यादीचे डोकयास रिव्हॉल्व्हर लावून दम देऊन फिर्यादीची सोन्याची चैन व सोन्याची अंगठी , रोख रक्कम व मोबाईल असा ९५,हजार रुपये किंमतीचा माल जबरीने चोरून स्विफट कारमधून पळून गेलेबाबत जेजुरी पो.स्टे . येथे गुन्हा दाखल होता व तसेच वडगाव निंबाळकर पो.स्टे . हद्दीत दि .२६ / १० / २०२० रोजी संध्या . १७.३० वा.चे सुमारास पळशी येथील सराफी व्यवसायिक अमर रंगनाथ कुलथे यांच्या अमर ज्वेलर्स दुकान बंद करून विक्रीसाठीचे दागिने मोटार सायकलवरून घेवून घरी जाताना ३ अज्ञात आरोपींनी बजाज पल्सर मोटार सायकलवरून येऊन फिर्यादीस गाडी बाजूस घेण्यास सांगितले व फिर्यादीचे तोंडावर मिरची पावडर टाकून फिर्यादीचे मोटार सायलकला लाथ मारून खाली पाडून फिर्यादीचे ताब्यातील ११ तोळे सोने व १० किलो चांदी अशी ११ लाख६५ हजार रूपये किंमतीचे दागिन्यांची बॅक जबरीने पळवून नेली होती त्याबाबत वडगाव निंबाळकर पो.स्टे.गुन्हा दाखल होता तसेच जेजुरी पो.स्टे. गुन्हयामध्ये असणारे आरोपींनी दि . २३ / ० ९ / २०२० रोजी निरा गावचे हद्दीतील अमेझॉन कंपनीचे स्टोअर फोडून त्यातील डी.व्ही.आर. ३ मोबाईल फोन , रोख रक्कम असा एकुण रू .७७ हजार ४९६ रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता . सदरचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी . नारायण शिरगांवकर , बारामती विभाग , धनंजय पाटील , भोर विभाग यांनी पोलीस निरीक्षक . पद्माकर घनवट , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण यांना गुन्हयातील मुख्य आरोपीतांना तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या . त्याप्रमाणे पो.नि. पद्माकर घनवट यांनी स्था.गु.शाखा , पुणे ग्रा . येथील पो . स.ई.शिवाजी ननवरे , अमोल गोरे , वडगाव निंबाळकर पो.स्टे.कडील स.पो.नि. सोमनाथ लांडे , पो . स.ई.शेलार , पो.स.ई.कवितके , सहा.फौज . दत्तात्रय गिरीमकर , शब्बीर पठाण , पो.हवा.चंद्रकांत झेंडे , उमाकांत कुंजीर , अनिल काळे , रविराज कोकरे , पो.ना.राजू मोमीन , जनार्दन शेळके , मंगेश थिगळे , अजीत भुजबळ , अभिजीत एकशिंगे , पो.कॉ. अमोल शेडगे , मंगेश भगत , बाळासाहेब खडके , धिरज जाधव , खान , सिताफ , मारकड , भुजबळ , खोमणे , सानप , जाधव , जैनक , चेतन पाटील , सुनिल कोळी , पो.कॉ.दगडु विरकर , अक्षय जावळे , समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून त्या पथकाचे मार्फतीने संमातर तपास सुरू केला . सदर गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींचा वावर असणारे परिसरात साधारणपणे १५० कि.मी.परिसरातील २०० सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तपासून आरोपींचे वावरासंदर्भात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून तपास केला होता परंतु आरोपी हे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलीसांनी पकडू नये म्हणून काळजी घेत होते परंतु नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकास तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की , जेजुरी पो . स्टे . गु गुन्हयातील चोरीस गेला माल हा चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे व शाम शशीराज मुळे हे वापरत आहेत त्यावरून स्था.गु.शा.पथकाने दोन्ही आरोपींना एक
संशयीत मोटार सायकल व तीन मोबाईल फोनसह दि . २५ नोव्हेंबर रोजी वाघाळवाडी येथून ताब्यात घेतले होते तेव्हा त्यांचेकडे केले तपासात चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे , रा . ढवळ , ता . फलटण , जि . सातारा याने त्यावे साथिदार शाम शशीराज मुळे , स . सध्या रा . व्ही.एन.ए.सिटी सोसायटी , निरा , ता . पुरंदर , जि . पुणे , निलेश बाळासाो निकाळजे , रा.सोनगाव बंगला , ता . फलटण , जि . सातारा , अक्षय विलास खोमणे , रा . कोहाळे बुद्रुक , ता . बारामती , जि . पुणे , राहुल पांडुरंग तांबे , रा . जेऊर , ता . पुरंदर , जि . पुणे , प्रविण प्रल्हाद राऊत , रा . चिखली , ता . इंदापूर , जि . पुणे , पप्पु उर्फ सुहास सोनवलकर , रा . वडले , ता . फलटण , जि . सातारा , प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने , रा . तामशेतवाडी , ता.माळशीरस , जि . सोलापूर यांचेसह मिळून वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरी , घरफोडी , दरोडा असे गुन्हे केल्याचे पोलीस पथकास निष्पन्न झाले होते त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना पथकाने अक्षय विलास खोमणे , निलेश बाळासो निकाळजे व राहुल पांडुरंग तांबे यास दि . २८ नोव्हेंबर रोजी अटक केली होती व . दि . २९ नोव्हेंबर रोजी पाहिजे आसलेला आरोपी नामे पप्पु उर्फ सुहास सोनवलकर , प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने व प्रविण प्रल्हाद राऊत हे वडले , ता . फलटण , जि . सातारा या ठिकाणी असलेबाबत माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी स.पो.नि. सोमनाथ लांडे , वडगाव निंबाळकर पो.स्टे . व पो.स.ई . शिवाजी ननवरे , स्था.गु. शा . यांनी टीमसह जावून प्रविण प्रल्हाद राऊत यास ताब्यात घेतले व पप्पु उर्फ सुहास सोनवलकर , प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने यांचा पाठलाग करीत असताना त्यांनी पोलीसांवे दिशेने पोलीसांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून ऊसाचे शेतात पळून गेले त्याबाबत पो.कॉ.भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पो.स्टे . गुन्हा दाखल झालेला आहे . सध्या दोन्ही आरोपी हे पाहिजे आरोपी असून त्यांचा विविध पथकामार्फत शोध सुरू आहे . आरोपी चंद्रकांत लोखंडे व त्याचे टोळीकडून उघडकीस आलेले आहे त्याचप्रमाणे नमुद टोळीने गुरसाळे , जिल्हा – सोलापुर , कळंबोली , नवी मुंबई या ठिकाणी देखील आरोपीनी जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे तसेच आरोपींनी इतर ठिकाणीही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे त्याबाबत अधिक तपास चालु आहे . सदर गुन्हयातील आरोपींनी संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून त्याआधारे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) कायदयांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे . राजगड पो.स्टे . येथील गुन्हयाचा तपास पो.नि.श्री . विनायक वेताळ व वडगाव निंबाळकर पो.स्टे.येथील गुन्हयाचा तपास स.पो.नि. सोमनाथ लांडे हे करीत आहेत .