गुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल

Admin
गुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल

पुरंदर  : प्रतिनिधी

गुळुंचे येथील काटेबारस यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. परंतु मुख्य यात्रेच्या दिवशी कुणीही काटे आणू नयेत तसेच बेशिस्त वर्तन करू नये. यात्रा काळात पोलीस खडा पहारा देणार असून कायदा मोडणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला. 
 
   राज्यात प्रसिद्ध असलेली गुळुंचे येथील काटेबारस यात्रा भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. श्रद्धेपोटी लोक आपली भक्ती व्यक्त करतात. पण या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेतील मुख्य कार्यक्रमही टाळला जावा. किमीत कमी लोकांत जे कार्यक्रम होतील तेच करा. सर्दी, खोकला होईल असे कार्यक्रम व गर्दिचे ठिकाणे टाळा कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्या असे आव्हान पोलीस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी गुळुंचे येथील यात्रेनिमित्त आढावा बैठकीत केले.

          यात्रा समितीने शासनाचे निर्बंध पाळून मोजक्या मानकरी, खांदेकरी यांच्यात यात्रा करण्याचा निर्णय घेतला असून देवाचे धार्मिक विधी, स्नान, घटस्थापना, पूजा, आरती यांसाठी पुजारी, मानकरी व यात्रा कमिटी यांच्या व्यतिरिक्त इतरांना मज्जाव करण्यात आला आहे.

      याबाबत, शनिवारी जेजूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, उपनिरीक्षक विजय वाघमारे यांनी यात्रा कमेटी पंच मधुकर निगडे-पाटील, पोपट निगडे-पाटील, जयसिंग निगडे-पाटील, जिर्णोद्धार कमेटीचे प्रमुख गोरख निगडे, गुळुंचेचे सरपंच संभाजी कुंभार, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, माजी उपसरपंच संतोष निगडे, पोलीस पाटील दिपक जाधव,  दिपक निगडे, उत्तम निगडे, ज्ञानदेव निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहूल शिंदे-पाटील, भरत निगडे यांनसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यात्रा कमेटीच्या पंचांनच्या हस्ते पोलीस निरिक्षक सुनील महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. आभार भरत निगडे यांनी मानले.
To Top