जेजुरीत पोलिसांचा हातभट्टी अड्ड्यावर छापा :
१२ हजारांची घटक रसायन केली नष्ट
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजूरी नजिकच्या भोसलेवाडी येथील पाझर तलावाच्या विहिरी जवळ भोर - पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हातभट्टी उध्वस्त केली. बेकायदा गावठी दारू तयार करण्याचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात आला. या छाप्यात १२ हजार ५०० रुग्णांचे घातक रसायन व साहित्य मिळुन आले. हे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
भोर - पुरंदर उपविभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १८ रोजी दुपारी ४:३० वाजता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील जेजूरी नजिकच्या भोसलेवाडी हद्दितील हबीरवाडी येथील पाझर तलावाच्या विहिरी जवळ अज्ञात व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे रसायन लावलेले दिसत आहे. अशी बातमी मिळताच डि.वाय.एस.पी धनंजय पाटील यांनी कार्यालयातील कर्मचारी.पोलीस काँस्टेबल सोमेश राऊत, पोलीस हवलदार हनुमंत भोईटे, चालक सहाय्यक फौजदार शिवाजी भगत यांनी बोलवून बातमीचा आशय सांगित दोन पंच बालवले. सर्व कर्मचारी, पंच व स्वतः शासकीय गाडीने भोसलेवाडी कडे निघाले. जवळ पोहचताच श सकीय वाहन दुर लावुन पायीच गेले. बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी पासणी केली असता दारु तयार करण्याचा कच्चा माल मिळुन आला. एक लोखंडी भोपळ बँलर, त्यामध्ये ५ हजार लिटर कच्चे हातभट्टीचे तयार रसायन दिसून आले. पोलीस हवलदार हनुमंत भोईटे यांनी १८० मिली मापाच्या काचेच्या बाटलीत हे कच्चे रसायन पंचांसमक्ष सिल करत उर्वरीत रसायण नष्ट केले.
जेजूरी नजिकच्या भोसलेवाडी हद्दितील हबीरवाडी येथील पाझर तलावाच्या विहिरी जवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार लिटर घातक रसायण व लोखंडी बँलर असे १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने ; सँपल घेऊन इतर घातक रसायन जागीच नष्ट करण्यात आले. या करवाइत भोर - पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील त्यांच्या कार्यालयाचे कर्मचारी सोमेश राऊत, हनुमंत भोईटे, चालक शिवाजी भगत यांनी सहभाग घेतला.