बारामती-सोमेश्वर-मुरूम-सुरवडी बससेवा सुरू : उद्या शुभारंभ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती आणि फलटण या दोन तालुक्यातील अनेक गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने बससेवा सुरू केली असल्याची माहिती पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.
उद्या दि ६ रोजी या बाससेवेचा शुभारंभ होत असून ही बस बारामती डेपोतून निघून माळेगाव, पणदरे, कोऱ्हाळे, करंजेपुल चौकातून सोमेश्वर कारखाना, वानेवाडी, मुरूम सातारा जिल्ह्यातील मुरूम, खामगाव, साखरवाडी आणि सुरवडी पर्यंत ही बस जाणार आहे. त्याच मार्गे ही बस परत येणार आहे. दिवसातुन ही बस तीन वेळा फेऱ्या मारणार आहे. पहिल्यांदाच या मार्गावर बससेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुरवडी या ठिकाणी मोठी कंपनी झाली असून पुणे जिल्ह्यातून अनेक कर्मचारी कामानिमित्त त्या ठिकाणी जात असतात, तसेच सोमेश्वर कारखन्यात अनेक कर्मचारी सातारा जिल्ह्यातून सोमेश्वर कारखान्यात येत असतात. तसेच पुणे जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी जाण्यासाठी तसेच फलटण भागातील प्रवाशांना सोमेश्वर कारखाना अथवा मोरगाव देवस्थान या ठिकाणी जाण्यासाठी या बसचा फायदा होणार आहे.
....................
याबाबत मुरूम येथील जेष्ठ नागरिकांनी तसेच मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे यांनी डेपो मॅनेजर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.
COMMENTS