परिंचेत शिवसेनेची हॅट्रिक : सरपंचपदी ऋतुजा जाधव तर उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत

Admin
परिंचेत शिवसेनेची हॅट्रिक : सरपंचपदी ऋतुजा जाधव तर उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत

परिंचे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- 

परिंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुजा जाधव व उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत यांची निवड करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव व माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य अर्चना जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.  
              सरपंच पदासाठी ऋतुजा धैर्यशील जाधव व वंदना महादेव राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये ऋतुजा जाधव यांना सात व वंदना राऊत यांना चार मते मिळाली. उपसरपंच पदासाठी दत्तात्रय रामचंद्र राऊत व सुजाता सुरेश दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दत्तात्रय राऊत यांना सात व सुजाता दुधाळ यांना चार मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शरद काटवटे यांनी सरपंचपदी ऋतुजा जाधव व उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत विजयी झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक शशांक सावंत, गाव कामगार तलाठी सुजित मंडलेचा निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते. 
        परिंचे ग्रामपंचायतीमध्ये दत्तात्रय रामचंद्र राऊत , अजित रमेश नवले , अर्चना संतोष राऊत , शैला सजंय जाधव , सुजाता सुरेश दुधाळ , सुनिल शिवाजी जाधव , ऋतुजा र्ध़ेयशील जाधव , गणेश संजय पारखी , प्रविण प्रमोद जाधव , पुष्पलता दामोदर नाईकनवरे ,
वदंना महादेव राऊत यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


To Top