सोमेश्वर च्या निवडणूकित पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर : इच्छुकांचे नाव पाहण्यासाठी वाचा सविस्तर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या असून कारखान्याच्या संचालक पदासाठी तब्बल ५३८ उमेदवार पात्र झाले आहेत. २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता ५३८ पैकी माघारी घेणार कोण ?हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
दि १५ फेब्रुवारी २२ फेब्रुवारी दरम्यान पासून इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. दि २३ फेब्रुवारी रोजी छाननी झाली यामध्ये ६३२ पैकी तब्बल ९४ अर्ज अपात्र ठरले असुन ५३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १० मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असून आता अर्ज माघारी कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे काल अर्ज छाननीत भाजपचे दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजपने वतीने ३५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शेतकरी कृती समितीच्या वतीने ५५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सद्या तरी राष्ट्रवादी, भाजप आणि शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
संपूर्ण कार्यक्षेत्रातील उमेदवारांचे नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा