'सोमेश्वर' ने पुरंदरच्या जिरायत भागातील ऊसतोडी प्राधान्याने कराव्यात : संदीप चिकणे

Admin
'सोमेश्वर' ने पुरंदरच्या जिरायत भागातील ऊसतोडी प्राधान्याने कराव्यात : संदीप चिकणे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याने पुरंदर तालुक्यातील जिरायत भागातील ऊसाच्या तोडी प्राधान्याने कराव्यात अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केले आहे. 
            याबाबत चिकणे यांनी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी नाझरे वि का सोसायटीचे माजी अध्यक्ष सदाशिव चिकणे, शरद वि का सोसायटीचे अध्यक्ष नितीन नाझीरकर, नाझरे क प चे माजी सरपंच शिवाजी नाझीरकर, माऊली नाझीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पुरंदर तालुक्याच्या जिरायत भागात सद्या पाण्याची टंचाई असून पाण्याअभावी ऊस जळून चालला आहे. त्यामुळे सदर जिरायत भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सोसायटी भरण्यासाठी आर्थिक तरतूद नाही, त्यामुळे आपल्या अधिकारात पुरंदर च्या जिरायत भागातील ऊसाच्या तोडी प्राधान्याने कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
To Top