'सोमेश्वर' ट्रेकर्स कडून 'कळसु'बाई शिखर सर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज........
खरे तर प्रत्येक ट्रेकर्सचा ध्येय असलेला "महाराष्ट्रातील एव्हरेस्ट" कळसूबाई चा ट्रेक म्हणजे एक वेगळाच आणी चित्तथरारक अनुभव असतो.
तसे नियमीत ट्रेकींग करणाराला फारसे अवघड वाटत नसले तरी सरळ वर उंचीवर चढाई असलेले कोणतेच अवघड शिखर महाराष्ट्रात नाही हे तेवढेच सत्य आहे .मात्र हे अवघड ट्रेकिंग करताना खुप काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा तुमची एक चुक तुमच्यासह ईतराना धोकादायक ठरु शकते .
आम्ही या पुर्वी राज्यातील अवघड असे हरिश्चंद्र गड ,तोरणा गड ,राजगड ,वासोटा (व्याघ्रगड ),रायगड प्रदक्षीणा ट्रेक ,हरेश्वर सलग तीन वर्ष कडेपठार दर आठवडा पायी वारी सोमेश्वर ते जेजुरी कडेपठार पायी वारी असे नियमीत ट्रेक केले मात्र हा ट्रेक ईतर ट्रेक पेक्षा अतिशय वेगळा व सरळ चढाईचा आहे दोन ती ठिकाणी चढाई करताना सरळ उंच शिडी आहेत तिथुन खाली पाहीले तर अक्षरश: डोळे फिरतात .या शिवाय संपूर्ण शिखर कडेकपारी तुन चढाईचे आहे .राज्यात दोन क्रमांकाचा हरिश्चंद्र गड तसा अवघड आहे मात्र त्याच्या ईतका धोकेदायक कळसूबाई वाटत नाही त्यामुळे काळजी घेतल्यास व्यवस्थीत तुम्ही सर करु शकता .
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नाशीक ,नगर ,पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असलेले सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील समुद्रसपाटी पासुन ५४०० फुट म्हणजेच १६४६ मिटर उंचीवर हे शिखर आहे . या शिखरावरुन उभे राहुन उत्तरेला नाशिकचा रामशेज किल्ला, अचला, सप्तश्रुंगीगड, मार्कंड धोडप,अशी डोगररांग नजरेस पडते,दक्षीणेस रतनगड, हरिश्चंद्र गड, पश्चिमेस विश्रामगड,अलंग मदन कुलंग गड,पुर्वेस भंडारदरा जलाशय हे सर्व कळसुबाई शिखरावरून पाहण्याचा आनंद घेता येतो .
आमच्या सोमेश्वर ट्रेकर्स चे सयोजक अशोक कोळेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय दादा शिंदे ,फलटण चे लेखा जोखा अधिकारी विवेक गायकवाड,समीर भाई मुलाणी ,मी स्वत: ॲड गणेश आळंदीकर ,सचीन सोरटे यांच्यासह सर्व शिक्षक संपत मासाळ सर ,कुचेकर सर ,अशोक नारायण भोसले सर ,कारंडे सर ,रासकर सर ,आण्णा मोटे सर ,सतत ३७ वर्ष हरिश्चंद्र हा अवघड गड करीत असलेले आणे चे राम संभेवार गुरुजी त्यांचे सहकारी कांबळे सर असा सुमारे १७ जणानी हा ट्रेक शनिवारी रात्री ३ वाजुन १५ मिनिटानी सुरु करुन ५-३० ते ५-५० पर्यंतम्हणजेच सव्वा दोन ते अडीच तासात पुर्ण करुन सकाळ चा सुर्योदय पाहण्याचा अविस्मरणीय आनंद कळसूबाई मातेच्या मंदीरापासुन घेतला.
उन्हाळा असल्याने ईथे धबधबे चालु नव्हते मात्र .वरती पोहोचल्यावर कोणत्याही ऋतूमधे गार वाऱ्याचा आनंद तुमचा सर्व घाम घालवतो .या ट्रेकची सुरुवात अकोले तालुक्यातील बारी गावातुन करता येते .हा ट्रेक सुकर करण्यासाठी अशी घ्या काळजी
ट्रेकला रात्री किवा पहाटे सुरुवात करा
एक दोन टप्प्यावर तुम्हाला टेंट (भाडोत्री तंबु ) मिळु शकतात त्यामुळे ईथे मुक्काम केल्यावर सकाळी लवकर ट्रेक ला सुरुवात करता येते बॅटरी ,काठी जवळ ठेवा. बुटाला ग्रीप असावी सर्वजण पुढे मागे एकत्रीत जावे.
पाण्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त टाकु नका
आदल्यादिवशीचा आहार हलका ठेवा
वाटेत पाणी पीऊ नका.चढताना व उतरताना शिड्यांचा आधार घ्या. ट्रेक झाल्यावर उतरुन आल्यावर गरम पाण्यात मिठ टाकुन पाय शेका नक्की तुमची थकान काही अंशी कमी होईल
कोरोनाच्या काळात शारीरिक तंदुरुस्ती साठी सुरक्षित ट्रेकिंग तुम्हाला नक्कीच तंदुरुस्त ठेवेल याची खात्री आहे
ॲड गणेश आळंदीकर
मो ...९४२३०२०२५५