सभासदांच्या खिशातील वीस कोटी रुपये कारखाना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगनमताने लुटण्याचा प्रयत्न: राजकीय सोयीसाठी 'सोमेश्वर' चा वापर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गाळप हंगामाच्या निमित्ताने सुरु असलेल्या गोंधळाने सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रपंच्याशी खेळण्याचे काम संचालक मंडळ आणि कारखाना व्यवस्थापना कडून सुरू आहे. असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी केला आहे.
याबाबत दिलीप खैरे यांनी दिलेल्या प्रशिदीपत्रकात म्हनटले आहे की, वास्तविक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस नोंदीच्या रेकॉर्ड पाहता चौदा ते पंधरा लाख टन ऊस कारखाना कार्यक्षेत्रामध्ये उभा असल्याच्या नोंदी कारखाना व्यवस्थापनाकडे होत्या त्या पार्श्वभूमीवर दर वर्षीचे होणारे गाळप सरासरी ऊस उत्पादन या वर्षीचा झालेले पाऊस मान या सगळ्यांचा विचार करता आडसाली उसाच्या सरासरी मध्ये घट झाली पण त्याच वेळी पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा या उसाच्या सरासरी मध्ये विक्रमी वाढ झाल्याचे दिसून
येत आहे या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने पहिल्या दिवसापासूनच ऊस तोड नियोजन करून ऊस इतर सहकारी व खाजगी कारखाना सोबत करार करून आपल्या ऊस उत्पादक सभासद यांचे नुकसान होऊ नये यासाठी देणे अपेक्षित होते परंतु कारखाना व्यवस्थापनाने केवळ खाजगी कारखान्यांच्या हितसंबंधाला जोपासण्यासाठी ऊस
उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे यामध्ये रोज किमान दीड ते दोन हजार टन ऊस तालुक्यातील काही भागात नेहमी दहाव्या व आकरा महिन्यातील ऊस लगणीचे प्रमाण मोठया प्रमाणावर असते असा ऊस वेळेवर न तुटल्याने व १ मार्च पासून खोडवा ऊस नोंदी घेण्याचे कारखाना व्यवस्थापनाने बंद करण्याचे परिपत्रक काढून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवून आर्थिक नुकसान करण्याची भुमिका घ्यावी हे चुकीचे असून सदरचे
परिपत्रक तातडीने मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे सन 2018 मध्ये सर्व साधारण सभेने विस्तारीकरण करण्यासाठी परवानगी दिलेली
असताना व बाजूचे अनेक कारखाने मोठे होत असताना व सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस क्षेत्र वाढत असताना विस्तारीकरणात जो गोंधळ सुरू आहे त्याकडे पाहता केवळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खाजगी कारखान्याला ऊस देण्यासाठी व त्यांच्या राजकीय सोयी करिता सोमेश्वर च्या सभासदांच्या प्रपंच्या सोबत खेळ सुरू आहे वेळेवर विस्तारीकरण केले असते तर त्यावेळच्या प्रस्त्वावनुसर ११२ कोटीत काम झाले असते मध्यंतरी जुनी मिल व ६० वर्षा पेक्षा जुने कालबाह्य बॉयलर व इतर मशिनरीचा वापर करून ७० कोटी ३८ लक्ष रुपयाचे विस्तारीकरण साखर आयुक्त यांचे कडून मंजूर करून घेण्यात आले ते काम ही जाणीव।पूर्वक तांत्रिक बाबी मुळे रद्द करण्याची भुमिका घेतली गेलेली असून आता निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला असताना पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने ऑनलाइन सभा घेऊन नव्या २०२०-२१ मध्ये विस्तारीकरणाला नवीन मान्यता घेण्याचं गडबडीत
पुन्हा काहीतरी नवा गोंधळ करण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचे दिसते विस्तारीकरण करण्याच्या नावाखाली किमान दीडशे ते दोनशे कोटीचे नवीन कर्ज कारखान्यावर पर्यायाने सभासदांच्या डोक्यावर केले जाणार आहे वास्तविक कारखान्याचे विस्तारीकरण
तीन वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर केले असते तर शंभर ते सव्वाशे कोटी पूर्ण झाले असते म्हणजे आजच्या हिशोबाने किमान ७० ते ७५ कोटी रुपये वाचले असते व आज सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडी च्या निमित्ताने होत असलेला त्रास झाला नसता आज सुरु असलेल्या हंगामामध्ये इतर कारखान्यांनी तोडून नेलेल्या कि चार लाख टन ऊस आला तीनशे ते चारशे रुपये पेक्षा कमी पैसे मिळणार आहेत.
याचा सरासरी विचार केला तर या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या खिशातील वीस कोटी रुपये केवळ कारखाना व्यवस्थापनाने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगनमताने लुटले जात आहेत पुढील हंगामामध्ये सुरू असलेले विस्तारीकरण पूर्ण होणार नसल्याने किमान पंधरा ते सोळा लाख टन किंबहुना त्यापेक्षा अधिक ऊस कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध होणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार करता ज्यांच्यावर विश्वास टाकून
सोमेश्वर च्या सभासदांनी आपली प्रगती करण्यासाठी जबाबदारी सोपवली होती ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान संचालक मंडळ हे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार असून अजित पवार यांनी सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दौड शुगर ने गाळपासाठी घेतलेल्या ऊसाला सोमेश्वर च्या अंतिम दराप्रमाणे बाजार भाव देऊन किमान ज्या शेतकऱ्यांनी केवळ त्यांच्या शब्दाखातर सोमेश्वर ची
सत्ता दिली होती त्यातून उतराई व्हावे अशा प्रकारची मागणी सोमेश्वर परिवर्तनाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. विस्तारीकरणाचे समर्थक व विरोधक आणि त्यांचे नेते सर्व एकाच असल्याचे आज समोर
आल्याने सभासदांची फसवणूक झालेचे दिसत आहे.