नीता फरांदे यांना सभापतीपदाची संधी द्या : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाची मागणी

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आली असल्याने जिल्हा परिषदेच्या निंबुत - करंजेपुल गटातील पंचायत समितीच्या निंबुत गणातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विक्रमी मताने निवडणूक आलेल्या निता फरांदे यांना पंचायत समितीचे  सभापतीपद देण्याची मागणी बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमधूम होत आहे.
         फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून आले होते. बागायती पट्यात १९८८ सालानंतर आजपर्यंत पंचायत समितीला सभापतीपद मिळाले नाही. या अगोदर कै. रामराजे जगताप, कै. वसंतकाका जगताप आणि कै. शिवाजीआण्णा भोसले यांनी सभापतीपद भूषविले होते. यानंतरच्या काळात तीन वेळा येथील पंचायत समितीच्या सदस्यांना उपसभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली होती.  पंचायत समितीचे आरक्षण ओबीसीसाठी असल्याने या अगोदर निता बारवकर यांना जिरायती भागातून संधी देण्यात आली होती. गुरुवार (दि.१८) रोजी सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी होणार आहेत. सध्या प्रभारी सभापती म्हणून प्रदीप धापटे कामकाज पहात आहेत. निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच असल्याने ते या पदावर  कोणाला संधी हे गुरुवारी स्पष्ट होणार असले तरी निता फरांदे यांना संधी देण्याची मागणी होत आहे.
To Top