सच्चा शिवसैनिक दिलीपमामा डेरे यांचे निधन

Admin
भोर : प्रतिनिधी

हिंदु हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चा शिवसैनिक आणि मामा नावाने  म्हणून भोर तालुक्यात ओळखले जाणारे नसरापूर येथील शिवसेनेचे जुने निष्ठावान कार्यकर्ते दिलीप पंडीत डेरे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
                 निष्ठावान व कट्टर शिवसैनिक अशी दिलीप डेरे यांची ओळख होती शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच नसरापूर गण विभागाचे प्रमखु म्हणुन त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. शिवसेनेच्या वतीने सन २००७ मध्ये भोर पंचायत समितीच्या नसरापूर गणामधुन त्यांनी निवडणुक लढवली होती. सन २०१५ ते २०१९ पर्यंत भोर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य म्हणुन देखिल त्यांनी काम केले होते. कोणाचीही भिड न ठेवत परखड वकृत्वामुळे ते प्रसिध्द होते. नसरापूर मध्ये शिवसेना वाढीसाठी तसेच ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
               त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी जावई असा परिवार आहे. कुलदीप कोंडे यांनी श्रध्दांजली वाहताना एक निष्ठावान शिवसैनिक गमावल्याची भावना व्यक्त करत दिलीप डेरे यांना शिवसेना कदापीही विसरु शकत नाही असे मनोगत व्यक्त केले.

To Top