कोविड स्कोर ८, मधुमेह त्यात एन्जोप्लास्टी तरीही ८१ वर्षीय टंकसाळे बाबांची कोरोनावर मात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

आपण रोज कोरोना संदर्भात बातम्या एकतो शिवाय आजूबाजूला घडत असलेल्या घटनांमधून समोर येत आहे की इतर आजार नसलेले धडधाकट असलेले तरुण देखील कोरोनाचे बळी ठरताहेत. अश्या  पार्श्वभूमीवर मधुमेह, एकदा एन्जोप्लास्टी,  हायपर टेंशन असलेल्या ८१ वर्षीय रामदास भगवंत टंकसाळे यांनी आठच दिवसात कोरोनावर मात केली. 
       वय जास्त असल्याने टंगसाळे बाबांची ट्रीटमेंट कशी होईल याबाबत त्यांच्या मुलाना काळजी वाटत होती. 
त्यांचं वय आणि इतर व्याधींचा विचार करता त्यांना तातडीने त्यांना सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर आय सी यु येथे अॅडमिट केले. त्त्यांच्या उपचाराकरिता करिता तातडीने remdisivir उपलब्ध नव्हते पण इतर औषधे सुरू केली. गरज पडेल तसे oxygen support देण्यात येत होते. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार प्लाजमा थेरपीचा प्रयत्न करायचे ठरले. डॉक्टर अनिल क़दम , डॉ सुरज सोनलकर, डॉ शुभम गाड़ेकर यांनी तातडीने आणि काळजीपूर्वक उपचार सुरु केले. दोंन वेळा प्लाजमा थेरपीचा उपयोग केला.
        या सगळ्या प्रयत्नांना केवल ६ दिवसांमध्ये यश आले. जेव्हा पुन्हा सी टी स्कॅन केला तर कोवीड स्कोर कमी झाला होता आणि बाबांना oxygen support ची गरज उरली नव्हती. 
      त्या नंतर त्यांचा discharge करन्यास काही हरकत नाहीं असा सल्ला डॉक्टर यानी दिला.
त्यांच्या मुलांनी डॉक्टर अनिल क़दम , डॉक्टर सुरज सोनलकर, डॉक्टर शुभम गाडेकर यांचे आभार मानले.
त्यांच्या मूलानी Facebook post करुण ग्रामीण भाग़ात ही शहरा प्रमाने चांगले उपचार सोमेश्वर आय सी यु मधे उपलब्ध होतात या बद्दल समाधान व्यक्त करुण सर्व होस्पिटल टीम चे आभार मानले.
To Top