हरिभाऊ शिंदे यांचे अपघाती निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
प्रमोद पानसरे

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील हरिभाऊ निवृत्ती शिंदे यांचे अपघाती निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. 
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
        काल रात्री बारामती येथे दुचाकीचा अपघाता झाला होता , या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.  पुणे येथे त्यांचेवर  उपचार सुरू होते.मात्र  आज सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. ते वडगाव निंबाळकर येथील स्वतंत्र विद्या मंदिर चे मा.क्रीडा शिक्षक व जनता शिक्षण संस्थेचे माजी संचालक होते . त्यांचे मूळ गाव  कुरणेवाडी असल्याने ते गावातील कार्यात सहभागी होणारे अबाल वृद्धंचे मित्र होते. त्यांच्या स्वभावाने त्यांनी पंचक्रोशीत मोठा मित्र परिवार जोडला होता. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
To Top