मायक्रो फायनान्स कंपन्याच्या जाचातून महिला बचत गटांना सोडवा : आरपीआयच्या अमोल साबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Admin
नीरा : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य लोक आर्थिक विवंचनेत असतानाच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला बचत गटाकडून सक्तीने वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला अडचणीत आल्या असून जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत लक्ष घालून पुढील सहा महिने या कर्जाच्या वसुलीच्या तगद्यातुन महिलांची सुटका करावी, अशी मागणी आर.पी.आय.चे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी केली.
        गेले वर्षभर लॉकडाऊनमध्ये महिलांच्या दोन हाताल काम नाही. एम.आय.डी.सी. मध्ये रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना महिण्यातून दोनच आठवडे काम असते. बाजारपेठा बंद असल्याने महिलांचा रोजगार बुडत आहे. कापड दुकान, जनरल स्टोअर्स, भांडी व्यावसाय व ब्युटीपार्लर हे व्यावसाय सलग तीन चार महिने बंद आहेत. येथे काम करणाऱ्या महिलांना एक रुपयांची ही आर्थिक मदत मिळत नाही. या महिलांनी घरगुती वस्तू घेण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कडून कर्ज घेतली आहे. या फायनान्स कडून लॉकडाऊन शिथील होताच बळजबरीने वसुली केली जात आहे. सकाळी लवकरच हे वसुली अधिकारी इनशर्ट, बुट, लँपटॉप घेऊन महिलांच्य दारात उभे असतात. सुरवातील शांत संयमाने कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती करातात. पण महिलांनी कारणे सांगण्यास सुरवात केल्यावर हे अधिकारी चढ्या आवाजात घरगुती वस्तू उचलून नेण्याची भाषा करतात असा आरोप अमोल साबळे यांनी केला आहे.
साबळे यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला बचत गटाकडून सक्तीने वसुली करण्याबाबतचे एक निवेदन दि. २१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात कारवाई करण्याच्या संबंधित विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार (ग्रुह शाखा) शुभांगी गोंजारे यांनी आदेश दिले होते. मात्र त्यानंतर सुद्धा याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी आर.पी.आय (आंबेडकर) चे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी आज दि. २८ जून रोजी नीरा येथे माध्यमांशी बोलताना केली.
To Top