मोरगाव :
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी हिराबाई बुताला ट्रस्टतर्फे एक महीन्यासाठी फिरता दवाखाना सुरु केला आहे . याद्वारे रुग्णांची ऑक्सिजन पातळी , रक्तदाब , तसेच किरकोळ आजारावर उपचार केले जाणार आहेत. याचे मोरगांव येथे उद्घाटन सरपंच निलेश केदारी यांच्या हस्ते करण्यात आले .
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या माध्यमातून किरण गुजर व पुणे महानगरपालिका सह आयुक्त संदीप ढोले यांच्या सहकार्याने बारामती तालुक्यात फिरता दवाखाना सुरु केला आहे . पुढील एक महीन्यासाठी हा दवाखाना सुरु राहणार आहे . मोरगाव येथे फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन आज सरपंच निलेश केदारी यांच्या हस्ते झाले . यावेळी ग्रामसेवक मोरेश्वर गाडे ,वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोले , वैद्यकीय अधीकारी आगवणे , त्रीवेदी , आशा सेविका , मोरगाव फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
तालुक्यातील प्रत्येक गावांत जाऊन रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सध्याच्या कोरोना काळात ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्य होत असल्याने परीसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे .