सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
करंजेपुल (ता. बारामती) येथील नागू यशवंत लकडे यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०१ वर्षाचे होते.
त्यांच्यामागे पत्नी, ४ मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. सिद्धिविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक माणिक लकडे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लकडे यांचे ते वडील होत. नागू लकडे हे परिसरातील प्रसिद्ध मेंढपाळ होते. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे ते काम चालूच होते. रान वनस्पती व वन्य प्राण्यांचे ते माहितगार होते.