सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे (वार्ताहार): परिंचे (ता.पुरंदर) येथील अश्विनी वाघोले यांच्या बॅंक खात्यावर अचानक जमा झालेले ३२ लाख रुपये परत केल्या बद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी अश्विनी वाघोले व अमोल वाघोले यांचा सत्कार करून कौतुक केले.यावेळी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव उपस्थित होते.
या बाबत सविस्तर हकिगत अशी आहे की अश्विनी अमोल वाघोले यांच्या मालकीच्या यशोधन एचपी गॅस एजन्सी या खात्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा वाल्हे बँकेच्या खात्यामध्ये ५ मार्च २०२० रोजी अचानक ३२ लाख ६८ हजार ८५ रुपयेे जमा झाले होते. बँकेला तीन दिवस सुट्टी असल्यामुळे ते पैसे कोणत्या खात्यातून आलेत हे समजत नव्हते मंगळवारी बँक चालू झाल्यानंतर बँकेतील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम कोठून आली आहे याची आम्हाला माहीत नसल्याचे सांगून आम्ही या खात्याची पडताळणी करून सांगतो.त्यावेळी अश्विनी वाघोले व अविनाश वाघोले यांनी बँकेमध्ये कागदोपत्री व्यवहार करून नजर चुकीने आलेले पैसे परत पाठवण्याची संबंधित खात्यात पुन्हा पाठवले.
COLA SLAO 22.कंपनीचे ३२ लाख ६८ हजार ८५ रुपये गेल्या चार महिन्यांपासून अश्विनी वाघोले यांच्या खात्यावर होते. गेल्या चार महिन्यांपासून संबंधित कंपनीने एकदाही यशोधन गॅस एजन्सी मध्ये गायब झालेल्या रकमेची चौकशी केली नाही.आज अखेर बँकेने नजर चुकीने आलेली ३२ लाख ६८ हजार ८५ रुपये परत केरुन एक महिना उलटला तरी देखील या कंपनीने एकदाही अश्विनी वाघोले यांच्याशी संपर्क केला नाही. खासदार सुप्रिया सुळे पुरंदरच्या दौऱ्यावर आल्या असता ३२ लाख रुपये परत पाठवणाऱ्या वाघोले कुटुंबाला भेटायची इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी वाघोले दांपत्याला जेऊर (ता.पुरंदर) येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. सुप्रिया सुळे यांनी आपण निस्वार्थीपणे आलेली रक्कम परत केल्याचे फेसबुकच्या माध्यमातून कळाले होते त्यामुळे पुरंदर मध्ये आल्यावर तुम्हाला भेटायचे होते.नजरचुकीने आलेले पैसे परत करुन तुम्ही समाजापुढे आदर्श निर्माण केला असून आपल्या हातून असेच कार्य घडण्याची शुभेच्छा दिल्या.