संत सोपानकाका देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी सोमेश्वर कारखान्याकडून ११ लाख तर निंबुत ग्रामस्थांकडून ५ लाख

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संत सोपानकाका देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर निंबुत ग्रामस्थांच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. 
            सोमेश्वर कारखान्याच्या वतीने गेली २५ वर्षापासून रथ देण्यात येतो तर सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाकडून दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी मानाची बैलजोडी दिली जाते. तसेच कारखान्याकडुन दरवर्षी पालखी सोहळ्याची कारखाना स्थळावर राहण्याची व जेवणाची सोय केली जाते. ११ लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल नुकताच कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला. यावेळी संत सोपानकाका देवस्थानचे अध्यक्ष adv. त्रिगुण गोसावी, देवस्थानचे मानकरी नितीन कुलकणी, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, मोहन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top