सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गेल्या दोन वर्षापूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या पाण्याने अनेक कुटुंब उघडयावर आली होती. याही वर्षी पुन्हा २०१९ च्या आपत्तीपेक्षा भयंकर मोठी आपत्ती आली आहे. कोकण, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत.
यासाठी सोमेश्वरनगर येथील युवकांनी एकत्र येत एक हात मदतीचा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि २६ जुलै ते ३० जुलै दरम्यान ही मदत स्वीकारली जाणार आहे. ज्यांना मदत करायची आहे त्यांनी सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज समोर आपली मदत जमा करावी.
आज सकाळी गौतम काकडे यांचेकडून १०० पाणी बॉक्स, महेश सत्तेगिरी यांचेकडून २०० भेळीचे पुडे, चेतन गायकवाड यांचेकडून औषधे तर सुनील घाडगे यांचेकडून एक किराणा किट अशी मदत आली आहे.