सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी झी24 तासचे भोर प्रतिनिधी निलेश खरमरे यांची नियुक्ती करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन खरमरे यांची पुणे येथे करण्यात आले.
पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक आज बुधवार दि.१४ रोजी पुणे क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्थ एस.एम. देशमुख होते. यावेळी शरद पाबळे, बाप्पूसाहेब गोरे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, एम.जी.शेलार यांसह तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य उपस्थीत होते.
नुक्तेच भोर तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची द्विवार्षीक निवडणूक बिनविरोध पारपडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी वैभव भुतकर, उपाध्यक्षपदी संतोष म्हस्के व माणिक पवार, सरचिटणीस (सचिव) पदी स्वप्निलकुमार पैलवान, कोषाध्यक्ष (खजिनदार) पदी किरण दिघे, तर कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत किंद्रे, नितीन धारणे, चंद्रकांत जाधव व किरण भदे यांची निवड झाली होती. तसेच तालुका समन्वयक म्हणून दत्तात्रय दिनकर बांदल यांची नियुक्ती केल्याबद्दल पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल एस.एम. देशमुख यांनी अभिनंदन केले.
पुण्यातील क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक पारपाडली. या बैठकीत खालील विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यत आले. २) मागील जमा खर्चास मंजुरी देण्यात आली. ३) सभासद पञकारांना ओळखपञ याबाबत आढावात्मक चर्चा करण्यात आली. ४) पुणे जिल्हा पञकार संघाचा आर्थिक निधी उभारण्याबाबत चर्चा करुन तालुका संघांनी निधी उभारण्याच्या सुचना देण्यात आल्या. ५) पुणे जिल्हा पञकार संघ संलग्न पुणे शहर पत्रकार संघ कार्यकारीणी विस्तार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ६) पुणे जिल्हा सोशल मीडियाच्य अध्यक्षपदी झी 24 तासचे भोरचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांची नियुक्ती करण्यात आली. ७) नुतन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व भोर तालुका पत्रकार संघ नूतन पदाधिकारी व जुन्नर व खेड तालुका अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.
बैठकीचे सुत्रसंचलन व सभेचे इतिवृत्त वाचन जिल्हा समन्वयक सुनील जगताप यांनी केले, तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.