पुरंदर : वाघापूर गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी कैलास कुंजीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गराडे : प्रतिनिधी

राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वाघापुर (ता. पुरंदर) गावच्या तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते कैलास नामदेव कुंजीर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. माजी अध्यक्ष शंकर तुळशीदास कड यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी कैलास कुंजीर यांची निवड झाली.
     याप्रसंगी सरपंच रेवती कुंजीर,उपसरपंच सौरभ कुंजीर , बाजीराव  कुंजीर, बापुसाहेब कुंजीर , बाळासाहेब कुंजीर, गौरीताई कुंजीर, सुनील बापू कुंजीर, विकास इंदलकर, कृष्णजी इंदलकर ,चांगदेव कुंजीर, शंकर  कड,विजय कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर , रमेश कुंजीर ,जालिंदर  कुंजीर,निवृत्ती कुंजीर, माऊली कुंजीर सुनीलतात्या कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य दीपाली कुंजीर,कोमल कुंजीर ,ताई कुंजीर आदींसह वाघापूरकर ग्रामस्थ उपस्थित होते.
    वाघापूर गावातील गावकारभारी व युवा नेत्यांच्या सहकार्याने गावातील तंटे गावातच मिटवण्यावर भर राहील. तसेच वाघापूर गावच्या विकास कामास सातत्याने प्राधान्य दिले जाईल असे कैलास कुंजीर यांनी निवडीनंतर सांगितले.
      कैलासतात्या कुंजीर यांची वाघापूर  तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  त्यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मा. सभापती  सुनील लोणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
        याप्रसंगी शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन  सुनीलबाप्पू कुंजीर, पुरंदर तालुका युवक काँग्रेस  माजी अध्यक्ष विकास इंदलकर, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे नेते सुनीलतात्या कुंजीर, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे संपर्क प्रमुख  संदीपआप्पा जगताप, दौंड शिक्षक समितीचे अध्यक्ष शशीभाऊ मांढरे , पुरंदर अध्यक्ष अनिलजी चाचर , शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) अध्यक्ष  संदीप कदम, पुरंदर तालुका एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष  आबासाहेब खवले , पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपसभापती रवींद्र  जाधव ,मानद सचिव  गणेश कामठे, माजी सभापती सुनील कांबळे, माजी उपसभापती बाळासाहेब कुंजीर, तज्ञ संचालक संभाजीराजे लवांडे, शिक्षकनेते  जनार्दन कुंजीर, संजयनाना कुंजीर, रामदास कुंजीर,  रवींद्र कुंजीर, दत्तात्रेय खेडेकर, चांगदेव  थिकोळे, अरविंद पिसाळ , बाळासाहेब शेळके, नंदकुमार कुंजीर, प्रवीण कुंजीर, मोहन कोलते आदी उपस्थित होते 


To Top