सोमेश्वरकरांच्या 'एक हात मदतीने' सातारा, सांगली व कोल्हापूर मधील सातशे पूरग्रस्त कुटुंबाना 'मायेचा घास'

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------   

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणी कृष्णा व पंचगंगा तसेच तारळी नदीच्या पुराने झालेल्या अतोनात नुकसानाला हातभार म्हणून सोमेश्वरच्या "एक हात मदतीचा फौंडेशन" द्वारे नुकतेच जवळपास पाच लाख रुपयांच्या जिवनावश्यक वस्तु त्यामधे किराणा व दैनंदिन जिवनातील वस्तु तसेच शुद्ध पाण्याचे बॉक्स याचे वाटप करणेत आले .
            सोमेश्वरकरांची मदत घेवुन  शनिवारी पाल खंडोबा,कोल्हापूर मधील शिरोळ तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर ,वाळवा , हवालदारवाडी ,बोरगाव ,नागराळे, शिरगाव आदी  ठिकाणी हि मदत पोहोचविणेत आली .एक हात मदतीचा या सोशल फौंडेशनचे कार्यकर्ते यांनी ही मदत पोहचवली. मागच्या दोन आठवड्यात व त्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे . 
पाल खंडोबा येथे  हे पाटण ,सातारा व कराड च्या सीमेवर चे गाव १९७६ नंतर प्रथमतः ४४ वर्षानंतर इतका पाऊस झालासुमारे ३५०/४०० घरांचे मोठे नुकसान झाले. येथे सर्व पुरग्रस्ताना तेथील सामाजीक कार्यकर्ते व खंडोबा देवस्थान विश्वस्त देवराज पाटील व सहकारी वर्गाच्या मदतीने वाटप करणेत आली .
     इस्लामपुर येथे तैसीन मनेर, आत्तार या दांपत्याच्या मदतीने, हवालदारवाडी येथे सौरभ व डॉ. पोळ यांच्या मदतीने बोरगाव ,वाळवा येथे शाहरुख नायकवडी व शिरोळ येथे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व धैर्यशील पाटील व सहकारी वर्गाच्या मदतीने  गरजुना वाटप केले . बोरगाव ,शिरगाव ,नागराळे व वाळवा येथे जाण्याचे रस्ते अद्याप बंद आहेत शिरोळ ला कृष्णा व पंचंगगा नदीच्या पुराने संपुर्ण गावात पात्र सोडुन दीड किमी आत पाणी शिरले तेथे मगर ,साप ,नाग असे ४० च्या वर प्राणी गावात व घरात  पाण्याबरोबर शिरले अद्याप तेथे स्वच्छता चालुच असुन शेती पिके जनावरांचे गोठे व घरे यांचे मोठे नुकसान झाले सुमारे ६०० लोक अद्याप बेघर आहेत त्याना  शिरोळ नगरपरिषद यांचे वतीने व गावातील दानशुरांच्या मदतीने महाविद्यालयात ठेवणेत आले आहे तेथे त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था आहे अद्याप तेथे अजुन शासकीय मदत पोहोचली नाही.सन २०१९ मधे देखील पुराने या गावाला मोठा फटका बसला होता व जिवीत हानी देखील झाली होती मात्र शासकीय मदत अद्याप तेथे पोहोचली नाही .
      सोमेश्वर पंचक्रोशीतील दानशुरांनी  केलेल्या मदतीच्या गाड्यांचे पुजन शुक्रवारी रात्री सोमेश्वर कारखान्याचे मा अध्यक्ष शहाजी काकडे, राष्ट्रवादी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पुणे जिल्हा एसटी महामंडळ नियंत्रक रमाकांत गायकवाड, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राजवर्धन शिंदे, सुनील भोसले, सोमेश्वर संचालक सिद्धार्थ गिते ,विक्रम भोसले, गौतम काकडे, डॉ सौरभ काकडे , दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर , डॉ विद्यानंद भिलारे ,डॉ राहुल शिंगटे ,अनिल गायकवाड, नवनाथ भोसले, adv, गणेश आळंदीकर,प्रमोद वायाळ, युवराज खोमणे, दीपक साखरे, मिलिंद कांबळे, योगेश सोळस्कर, अमर होळकर व इतर  पदाधिकारी यांचे हस्ते करून रवाना करण्यात आले.
To Top