रायगड : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काही दिवसांपूर्वी कोकणात पावसाने प्रचंड हाहाकार माजवला अनेक शहर गाव पाण्याखाली गेली काहींचे तर संसारच उध्वस्त झाले, होत न्हवत ते सर्व काही हातातून निघून गेल. घरात असलेले धान्य, किराणा, कपडे सर्व सर्व पाण्याखाली गेल्याने कोकण वासीयांना प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागले होते.
शेकडो उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी अनेक स्तरांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वेध सह्याद्री तर्फे सुद्धा आपले कर्तव्य असल्याचे म्हणत कोकणातील पूरग्रस्त भागांत मदतकार्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे निजोजन केले होते. यासाठी वेध सह्याद्री तर्फे मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड सह महाराष्ट्रातल्या अनेक भागांतून प्रत्येकानेच जमेल त्या परीने मदतीचा हात पुढे करत वेध सह्याद्रीच्या एक हात मदतीचा या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.
गेले आठवडा भर वेध सह्याद्रीच्या सदस्यांकडून मदत संकलित करणे, किट तयार करणे अशी कामे सुरू होती रविवार दि. १ ऑगस्ट रोजी संकलित मदत घेऊन संस्थेच्या सदस्यांनी कोकण पूरग्रस्त भागात भेट देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.मोहिमे दरम्यान गोठे, शिवठरवाडी, भाईवाडा, खरवली, कोंदिवते, वडवली, दस्तुरी नाका, भावे आदिवासी वाडी तसेच पोलादपूर मधील काही गावांतील नागरिक यांच्या सह सुमारे २५० तर ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट व पाण्याचे वाटप करण्यात आले.