सोमेश्वर रिपोर्टर टीम------
आधार सोशल फाउंडेशन आयोजित ऑनलाईन चित्रकलास्पर्धा-२०२१ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती तालुक्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन.पुरुषोत्तम रामराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आधार सोशल फाउंडेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती.
या चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून पाचशे स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील प्रथम क्रमांक मिळवलेले विजयी स्पर्धक श्री. भागूजी विठ्ठल शिखरे यांना हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील या मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.यावेळी फाऊंडेशनचे सदस्य श्रीराज जगताप व रोहित जगताप उपस्थित होते.आमदारांनी आत्तापर्यंतच्या केलेल्या फाऊंडेशनच्या कामाची चौकशी केली पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.