सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : प्रतिनिधी
वीर (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची सोमवार दि.20 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी गणेश ज्ञानोबा वाघ एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी कुंभार यांनी जाहीर केले.
सोनाली विजय कुदळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालायत निवडणूक घेण्यात आली. यावेळी या पदासाठी एकमताने गणेश ज्ञानोबा वाघ यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर वचकल, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश धसाडे, गणेश गुलदगड, महिपत समगिर, योगेश धुमाळ, विनोद चवरे, नवनाथ माळवे, सुनिता धसाडे, रोहिणी खोमणे, माधुरी तांदळे, ज्योती चवरे,सोनाली कुदळे,सरिता धुमाळ, आशा सोनवणे, सारिका धुमाळ त्याच प्रमाणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.