बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उरलेल्या २९२ रुपयांमधील १०० रुपये परतीची ठेव कपात करून उर्वरित १९२ रुपये तातडीने सभासदांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी केली आहे.
याबाबत दिलीप खैरे, पी के जगताप, बाळासाहेब भोसले, शंकर दडस, खलील काझी व इंद्रजित भोसले यांनी कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कारखान्याने मागील गाळप हंगामातील ऊसया अंतिम दर ३१०० घोषित केला असून त्यातील एफ आर पी २८०८ यापूर्वी अदा केले आहेत व त्यातील उर्वरीत २९२ मधील २०० परतीची ठेव म्हणून कपात आणि ९२ रूपये दिवळी पूर्वी ऊस उत्पादकांना देणार असे घोषीत केले असून वास्तविक अवघ्या ९२ रूपयात शेतक-यांनी शेतातील कामे व दीपावली सारखा सण कसा साजरा करणार हा प्रश्न असून दीपावली अवघ्या दहा दिवसांवर आली असूनही अद्याप घोषित केलेली रक्कम जमा झालेली नाही. आपणास या पत्राव्दारे ऊस उत्पादक सभासदाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की २०० रूपये परतीच्या ठेव कपाती ऐवजी १०० रुपये कपात ( कपात कमी ) करून १९२ रूपये रक्कम उत्पादक सभासदाच्या खात्यावर ताताडीने जमा करावेत अशी मागणी निवेदनात केली आहे