'सोमेश्वर'च्या कामगारांना दिवाळीनिमित्त १६ टक्के बोनस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना सन २०२०-२०२१ चा कामगारांना दिवाळीनिमित्त ऍडव्हान्स १६ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
           आज संचालक मंडळाच्या पार पडलेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. तसेच कारखान्यात रोजंदारीवर काम करणारे पुरुष व महिला यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कारखान्याचे पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर व कार्यकारी संचालक राजेन्द्र यादव, सर्व आजी माजी संचालक मंडळ उपस्थित होते. कामगार नेते तुकाराम जगताप, कामगार संचालक बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड यांनी कामगारांच्या वतीने चर्चा केली.
To Top