बारामती ! अखेर झारगडवाडीतील त्या अतिक्रमणावर हातोडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
डोर्लेवाडी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत हद्दीत गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधलेली पक्की, आणि कच्ची घरे ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेत आज शुक्रवारी( ता. २२ ) पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. या निर्णयाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

झारगडवाडी ( बारामती ) येथील सरकारी गायरान क्षेत्रांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पक्की घरे तसेच कच्ची घरे बांधून बस्तान बांधले होते काहींनी सिमेंटचे खांब उभा करून अतिक्रमण केले होते यामध्ये 29 जणांनी या गायरान क्षेत्रात अतिक्रमण केले होते त्या सर्वांना केलेले अतिक्रमण  काढून टाकण्यासाठी झारगडवाडी ग्रामपंचायत च्या वतीने वेळोवेळी तोंडी सूचना आणि लेखी स्वरुपात अनेक वेळा नोटिसा दिल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिशीला अतिक्रमण केलेल्या नागरिकांकडून वारंवार केराची टोपली दाखवली जात होती यामुळे झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण काढण्याचा धाडसी निर्णय सदस्यांच्या मासिक मिटिंग मध्ये घेऊन आज शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्ता मध्ये मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही अतिक्रमनाची कारवाई केल्याने गावांतील ग्रामस्थांनी या निर्णयांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच नितीन शेडगे, उपसरपंच वैष्णव बळी, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बारामती मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र बोरकर, दयाराम महाडिक, गोरख बोरकर, रमेश बोरकर, सतीश ( फौजी ) कुलाळ, पोलीस पाटील शोभा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य अजित बोरकर, कल्पना झारगड, मालन टिंगरे, प्रशांत बोरकर, सोनाली चव्हाण, संतोष नेवसे, अनिता जाधव, सोनाली करे, पदमनाथ निकम, वैशाली मासाळ, पूनम आवटे ग्रामविकास अधिकारी बी.डी. काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन शेडगे ( सरपंच ) - झारगडवाडी ( बारामती ) गावामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान क्षेत्र आहे यात काहीजणांनी पक्की घरे, कच्ची घरे, सिमेंट चे खांब उभा करून अतिक्रमण केले होते. अनेक वेळा ग्रामपंचायत कडून त्यांना केलेले अतिक्रमण काढावे यासाठी रीतसर नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र याला अतिक्रमण वाले जुमानत नव्हते. यात वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहून काहीजण अवैध धंदे देखील करत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे गावचे गाव पण आणि गावाचे नाव बदनाम होत असल्याने झारगडवाडी ग्रामपंचायत ने धाडसी निर्णय घेऊन आज शुक्रवारी मोठा पोलीस बंदोबस्तात झालेले अतिक्रमण जेसीबी मशिनच्या साह्याने जमीनदोस्त केले आहे. आता इथून जो कोणी बेकायदेशीर अतिक्रमण करेल त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल. यात पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांच्यासमवेत आलेल्या सर्व सहकारी टीमने मोठे सहकार्य केले त्यांचे आभार मानतो.

झारगडवाडी ( बारामती ) ग्रामपंचायत च्या वतीने २९ जनावर केलेली कारवाई ही योग्यच आहे यात झालेल्या अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू होते यामुळे या गावातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता महिलांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता यामुळे झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने केलेली कारवाई ही ही योग्यच असल्याचे मत छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बारामती मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र बोरकर दयाराम महाडिक यांनी व्यक्त केले आहे. तसेच महसूल अधिकारी आणि पोलिसांनी यात मोठे सहकार्य केले त्याचे मनापासून आभार मानतो.
To Top