भोर ! तालुक्यात लालपरी थांबूनच : विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या इतर प्रमुख मागण्यांसाठी भोर एसटी आगाराच्या कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले असल्याने भोर आगाराच्या बसेस सोमवार दि-८ पहाटेपासूनच थांबून आहेत.यामुळे तालुक्यातील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.                             
             या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी कार्यकर्ते कपिल दुसंगे,स्वाती गांधी,दीपाली शेटे,किरण दानवले,निलेश कोंडे,सुनील पांगारे यांनी भेट देऊन सोमवार दि.८ पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी कोंडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व न्याय हक्कासाठी कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहू तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्नशील आहेत असे आश्वासन दिले.या आंदोलनामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे मोठे हाल झाल्याने एसटी महामंडळाच्या कार्य पद्धतीवर वर्षनुवर्षं विश्वास ठेवणारे प्रवाशी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
To Top