सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई,अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "एडीप (ADIP) योजनेअंतर्गत" दिव्यांग बंधू आणि भगिनींना व वयोश्री योजनेतून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना
कृत्रिम अवयव व सहाय्यक साधने
मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन वार बुधवार ते शुक्रवार दि.१ ते ४ डिसेंबर २०२१ रोजी बारामती येथील महिला ग्रामीण रुग्णालय बारामती याठिकाणी सकाळी ९:०० ते सायं. ५:०० वाजेपर्यंत तसेच ग्रामीण भागामध्ये शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
तरी तालुका व शहरातील दिव्यांग व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत साहित्य वाटपासाठी पूर्वतपासणी करून घ्यावी असे आवाहन बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर व इम्तियाज शिकीलकर यांनी केले.
तपासणीस येताना पात्र लाभार्थी नागरिकांनी आधारकार्ड व रेशनकार्ड झेरॉक्स घेऊन यावे.