सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाबळ (ता. शिरूर) येथील पाबळ-लोणी रस्त्याने रोहिदास गोरडे हे त्यांच्या जवळील एम एच १४ ई एक्स ९०५८ या दुचाकीहून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गोरडे गंभीर जखमी झाल्याने येथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत रोहिदास नाथू गोरडे (रा. गोसासी ता. खेड जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.
याबाबत खंडू धोंडीभाऊ गोरडे (वय ४५ वर्षे रा. गोसासी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.
COMMENTS