नामदेवराव पाटील वाचनालयात विद्यार्थी दिन साजरा
सोमेश्वर रिपोर्टर टीम
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोऱ्हाळे बुद्रुक येथील नामदेव पाटील सार्वजनिक वाचनालय विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक अनिल दणाणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले. तसेच विद्यार्थी दशेत वाचनाचे महत्व विशद केले. तर सहदेव चव्हाण यांनी विद्यार्थी दिनाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी गावचे सरपंच रवींद्र खोमणे, प्रा. डॉ. सहदेव चव्हाण, राहुल भगत, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष महेश चव्हाण, ग्रंथपाल अनिल चव्हाण, ग्रंथालयातील कर्मचारी व सेवक उपस्थित होते.
हेमंत गडकरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर ग्रंथपाल अनिल चव्हाण यांनी आभार म्हणाले.