सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा दि ३०
ज्या मुलांनी बापाचं बोट धरलं त्यांना कधीही आयुष्यात कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही .फक्त बाप्पाचं बोट धरून चाला बापांपेक्षा मी मोठा झालो हे कधीही समजू नका बाप पोराला खांद्यावरती घेतो ! कारण जी स्वप्ने मी पाहू शकले नाही ती माझ्या मुलाने पाहावेत आणि पूर्ण करावीत हीच त्याची अपेक्षा असते. असे मत ह.भ.प. नेहा भोसले यांनी व्यक्त केले.
नीरा ता. पुरंदर येथे नीरा दत्तघाट या ठिकाणी उद्योजक दादासो शिंदे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी
पुरंदर चे आमदार संजय जगताप, उद्योजक सचिन सातव, रणजित तावरे, पुणे जिल्हा परिवहन महामंडळ नियंत्रक रमाकांत गायकवाड, विशाल गायकवाड, जीवन शिपलकर सरपंच कोठा, सोपान हिरवे व्यापारी ग्रामीण पतसंस्था, शंकरराव मर्दाने अध्यक्ष नाभीम महामंडळ पश्चिम महामंडळ आदींनी दादा शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हभप भोसले पुढे म्हणाल्या, प्रत्येकानं एकदा तरी आपल्या बाप्पाला आठवावं व्हॉट्सअॅप आणि फेसबूक याद्वारे आपण लांब लांबच्या मित्रांना हाय बाय करत असतो. तासन्तास त्यांच्याबरोबर लपून चॅटिंग करतो पण आठवड्यातून ५ मिनिटेही आपण आपल्या आई वडिलांशी व्यवस्थित बोलत नाही. अशी परिस्थिती आता समाजामध्ये निर्माण झाली आहे ती सुधारण्याची गरज आहे. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पाहा त्यांच्या कष्टाची जाणीव होईल असे हभप. नेहा भोसले यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी शिंदे कुटूंबीय यांच्याकडून २५१ ग्रंथराज 'ज्ञानेश्वरी' चे वाटप करण्यात आले .
------------------- -
बारामतीच्या पश्चिम भागातील प्रसिध्द होती 'मामाभाच्या'ची जोडी
दादासो हनुमंत शिंदे यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे त्यांचा भाचा जावई अभिजीत सुदाम पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दादा व अभिजीत यांचे 'मामाभाचा' असे नाते होते. नंतर मामा दादा शिंदे यांनी आपली मुलगी भाचा असणाऱ्या अभिजित दिल्याने त्यांच्यातील नाते पूर्वीपेक्षा जास्त घट्ट झाले. मामा दादा शिंदे यांनी सोमेश्वरनगर येथे कपड्यांचे भव्य दुकान उभारून त्याची सर्व जबाबदारी जावई अभिजितकडे दिली अभिजीतनेही मामाच्या विश्वासास पात्र राहून धंद्यात भरभराट केली. हे सर्व असताना यापलीकडे त्या दोघांचे मैत्रीचे नाते होते. दादा व अभिजीत हे दोघे एकत्र व्यवसाय करीत दादांना सोमेश्वर मध्ये पदार्पण केल्यावर त्यांना एक आधार अभिजीतचा दोघे एकत्र जीवाने राहत होते सर्व गोष्टी एकमेकांना सांगत दादा मुलाप्रमाणे वागवत होते सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करत असत कोणतीही गोष्ट दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय करत नसत अचानक दादा सोडून गेल्याने अभिजित यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ही मामा भाच्या च्या जोडीतला मामा पुन्हा पहावयास मिळणार नाही अशी खंत पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे .