सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : प्रतिनिधी
काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेलया गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ज्योतिर्लिंग मंदिरात यात्रा उत्सव सुरु आहे. प्रथेप्रमाणे उद्या (ता.१५) बाराव्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. आज कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे देवाची काठी, श्री ज्योतिर्लींगाच्या तसेच ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना भाविकांनी भक्तिमय वातावरणात नीरा नदीत स्नान घातले.
ज्योतिर्लिंग मंदिरात मागील अकरा दिवसांपासुन सुरु असलेले धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, बारा दिवस चालणारा छबिना तसेच १२ दिवसांच्या उपवासाची सांगता उद्या काटेमोडवणाने होणार आहे. प्रथेप्रमाणे काल रात्री गावात देवची बहिण समजली जाणरी काठीने प्रवेश केला, त्यानंतळ पालखीची सवाद्य नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी व मानाची काठी गावातील सर्व भागातून फिरविण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे फुलांच्या पायघड्या व आकर्षक रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी पालखीतील उत्सव मुर्तीची पुजा केली. नगरप्रदक्षिणेसह छबिन्याचा कार्यक्रम पहाटे ३.०० वाजेपर्यंत चालु होता. आज सकाळी अभिषेक व आरती झाल्यानंतर ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे पंच तसेच भाविकांनी अकरा वाजता ढोल ताशाच्या गजरात पालखी मंदिरा बाहेर काढली.
कर्नलवाडी येथून ज्योतीबा देवाची पालखी रथातून आल्यानंतर गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग महाराज व मानची काठी सहवाद्य रथातून नीरेकडे निघाल्या. नीरा स्नानासाठी पालखी बरोबर नीरा, गुळुंचे, कर्नलवाडी व बारा वाड्यावस्त्यांवरुन अनेक भाविक सहभागी झाले होते. पालखी नीरा नदीकाठी दत्तघाटावर आणून उपस्थितांनी आधी मानाची काठी व नंतर ज्योतिर्लींगाच्या तसेच ज्योतिबाच्या उत्सवमुर्तींना मोठ्या श्रद्धेने निरा नदिच्य पवित्र तिर्थाने जलाभिषेक घातला. यात्रा कालावधीत कोरोनाचे नियम पाळत शांतता राखून भाविकांना सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे गोरख निगडे केले.