बारामती ! शेतकरी महावितरणच्या दारी : ऊसाचं उभं पिके तुटून जाईपर्यंत विजबिलाला मुदत वाढवून मिळावी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शेतकऱ्यांची थकीत व चालू बिले थकीत असल्याने महावितरण ने सगळीकडेच ट्रान्सफॉर्मर सोडवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उभी ऊसाची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी १ जानेवारी पर्यंत वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ वाढवून मिळावी अशी विनंती सोमेश्वरनगरनगर परिसरातील शेतकऱ्यांनी सोमेश्वर महावितरणला केली आहे. 
याबाबत आज वाणेवाडी,मुरुम व वाघळवाडी येथील शेतकऱ्यांनी सोमेश्वर महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे यांना निवेदन दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व शेतकरी आपणास विनंती करत आहोत की आपण शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करु नये.परिसरातील सर्व शेतकरी ऊस उत्पादक असून ते ऊस बिलातून वीज बील देयक देण्यास तयार आहेत.तरी आपण सहकार्य करत शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान करु नये अशी विनंती केली आहे. यावेळी दिग्वीजय जगताप, संग्राम जगताप, रविराज जगताप, योगेश भोसले, कैलास भोसले, बाबुराव दादा भोसले, संभाजी शिंदे, कल्याण तुळसे आदी शेतकरी उपस्थित होते.
To Top