सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिक्रापूर : प्रतिनिधी
जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे शेतातील उसतोड सुरु असताना उसाच्या शेतात मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोि स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असताना सदर मृतदेहाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
जातेगाव खुर्द येथील बबन मासळकर यांच्या शेतातील उसाची तोड सुरु असताना अचानकपणे उसतोड कामगारांना शेतात मानवी सांगाडा दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी शेतात मानवी सांगाडा मिळून आला तर त्या व्यतिरिक्त काहीही मिळू शकले नाही. मात्र, सदर सांगाडा पुरुष जातीचा कि स्त्री जातीचा आहे या चौकशीसाठी उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अभिजित बबन मासळकर (वय ३६ वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत याबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ८६००४२०७९५ व ८८८८८६७७६८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.