सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर-महाड मार्गावर चोरलेली रिक्षा चोरटा घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून भोर पोलीस ठाण्याचे नाईक अमोल मुर्हे यांना मिळाल्याने निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तीन साथीदारांना बरोबर घेऊन रिक्षाचा १५ किलोमीटर फिल्म स्टाईलने पाठलाग करून आरोपी रवी बाळासाहेब धोत्रे वय -३० रा.रांझे ता.भोर यास अटक केली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोलावडे गावच्या हद्दीत भोर -कापूरव्होळ मार्गावर उभी असलेली रिक्षा एम एच १२ क्यू आर ४२७९ आरोपी रवी धोत्रे याने ४ ऑक्टोबरला रात्रीच्या वेळी चोरून नेहली होती.या गुन्ह्याची नोंद भोर पोलिसात होती.शनिवार दि-२० चोरीची रिक्षा भोर मार्गे महाडकडे आरोपी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,पोलीस नाईक अमोल मुर्हे, यशवंत शिंदे,वर्ष भोसले,शोकत शेख ,अश्विनी जगताप,सोनाली इंगुळकर यांनी १५ किलोमीटर दुर्गम भागात निगुडघर ता.भोर परिसरात पाठलाग करून रिक्षासह आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली.आरोपी धोत्रे याच्यावर पुणे शहरात २० ते २५ दुचाकी चोरीचे गुन्हे असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.