डॉ.प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

Pune Reporter
डॉ.प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई, दि. २३
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

 या पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डॉ.प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले आहे.
To Top