भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील खालचे महूडे ता.भोर येथील शेतकऱ्यांना शेतात काम करताना ५ जण संशयितरित्या आढळून आले होते.त्वरित शेतकऱ्यांनी सतर्कता राखीत भोर पोलिसांशी संपर्क करून ताबडतोब पाचही जणांना ताब्यात दिले.
महूडे ता.भोर गावच्या शिवारात दबकत दबकत २ महिला व ३ पुरुष रविवार दि-७/सकाळच्यावेळी शेजारील गावांची टेहळणी करीत आहेत.असे स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आल्याने शेतकऱ्यांनी भोर पोलिसांशी संपर्क केला.तात्काळ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे,हवालदार अमोल मुर्हे,राहुल मखरे,अविनाश निगडे यांनी घटनास्थळी जाऊन संशयित पाच जणांना ताब्यात घेतले. संशयितांवर सोमवार दि-८ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.