राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा पुणे जिल्हा दौरा

Pune Reporter
राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष  
ज. मो. अभ्यंकर यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे दि. १७: 
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे उद्या दि. 18 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे दि. 18 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11 वाजता आगमन होईल. सकाळी 11.30 वाजता बार्टीचे महासंचालक यांच्यासोबत अनुसूचित जातीच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता समाज कल्याण आयुक्त यांच्यासोबत आयोगाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदे भरण्याबाबत चर्चा. दुपारी 3 वाजता अनुसूचित जमातीच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी, शिष्टमंडळांसोबत बैठक आणि त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथून मुंबईकडे प्रयाण असा त्यांचा दौरा आहे.

To Top