सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२१-२२ चा गाळप हंगाम नुकताच सुरू झालेले आहे. कायदया प्रमाणे गाळप झालेल्या उसाला F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक असताना कारखाना प्रशासन F.R.P रक्कम दोन ते तीन टण्यामध्ये देण्याच्या तयारीत आहेत. तसेच F.R.P रक्कमेचे तुकडे करून उर्वरित F.R.P ला व्याज देवून सभासदांची दिशाभुल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सदर व्याजाचा भुर्दड हा सभासदांनाच सोसावा लागणार आहे.
वास्तविक सोमेश्वर कारखान्याचे नेट F.R.P रक्कम २८६६/- रू. प्रति मे टन असुन सदर रक्कम एकरक्कमी सभासदांना मिळाल्यास सभासदांची सोसायट्यांची कर्ज एकरक्कमी भरता येतील व त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनव्याजी कर्जाचा त्यांना फायदा घेता येईल तसेच एकरक्कमी रक्कमेमुळे वैयक्तिक कामे सभासदांना पुर्ण करता येतील. मात्र बँक उचल कमी मिळत आहे त्यामुळे आपण F.R.P रक्कम पुर्ण देवु शकत नाही अशी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी भुमिका घेतली आहे. आज जिल्हा बँक पोत्यावर ८५ टक्के रक्कम उचल देत आहे. कारखान्याने अर्ज केल्यानंतर सदर पोत्यावरील उचल ९० टक्के होणार आहे. आज १० टक्के रिकव्हरी प्रमाणे आज बँक कर्ज वितरीत करीत आहे. एक ते दोन महिन्यात रिकव्हरी वाढल्यानंतर रिकव्हरी मार्जिन सुध्दा मिळणार आहे. साधारणत: बॅक उचल ९० टक्के मिळाल्यास कारखान्यास एकुण २३८५/- रू. उपलब्ध होतील. उर्वरित ४८१/- रू. रिकव्हरी मार्जिन, आज साखर विकी ३५०० ते ३६०० रू. भावाने चालु आहे त्यामधील फरक तसेच विज विकीच्या येणे असणारे बिल, कारखान्याचा को-जन प्रकल्प एप्रिल, मे, जुन अखेर पर्यंत चाललेला आहे. डिस्टीलरी सुध्दा मे अखेर पर्यंत सुरू होती. या सर्वांतुन मिळालेले उत्पन्न, तसेच स्पिरीट विक्री या मधुन मिळालेले उत्पन्न सभासदांना F.R.P रक्कम देण्यासाठी कमी पडलेली रक्कम किंमत चढउतार निधी २० कोटी रूपये जमा आहे त्यामधुन देखील आपण रक्कम घेवू शकतो. तसेच जिल्हा बँकेच्या आत्मनिर्भर कर्ज योजनेतुन २० कोटी रूपये कर्ज घेतलेले आहे त्यामधुन आपण रक्कम घेवु शकतो. तसेच साखर आयुक्त कार्यालय सभासदांच्या उस बीलातुन वीजवितरण कंपनीचे सभासदांचे लाईटबील कपात करणे संबंधी प्रयत्नशील आहे. तरी आपल्या कारखान्यातुन सभासदांच्या पुर्वपरवानगी शिवाय लाईटबीलसह कोणतीही इतर वसुली उसवीलातुन करण्यात येवु नये कारण ती बेकायदेशिर आहे.
तरी आपला कारखाना जिल्ह्यात राज्यात अंतिम भाव देण्यात आग्रेसर आहे. म्हणुन सभासदांना F.R.P रक्कम एकरक्कमी देवून जिल्ह्यातील F.R.P एकरक्कमीची कोंडी फोडावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी केलेली आहे.