सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
१४ नंबर कांदळी( ता. जुन्नर )येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी दिनांक २४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पतसंस्थेत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे
याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,१४नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्ग लगत आहे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला यामध्ये राजेंद्र भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. चोरट्यांनी अडीच लाखाची रक्कम लंपास केली असल्याचा अंदाज आहे. याबाबतचा पोलीस तपास चालू आहे