फलटण दि २५
फलटण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीमध्ये फलटण -लोणंद रोड हॉटेल ज्ञानराज ऍण्ड लॉजिंग इमारतीमध्ये प्रवीण रंगराव पवार वय ३२ राहणार वडवणी ता: फलटण जि सातारा अर्जुन जयसिंग बर्गे वय ३७ रा चिचनेर ता जि सातारा व ज्ञानराज चे मालक यांनी हॉटेल ज्ञानराज याठिकाणी पश्चिम बंगाल येथील महिलेस वेश्या म्हणून शरीरसंबंधासाठी ग्राहक पुरवीत असताना मिळून आले आहेत.यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबत गुन्हा फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे .
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीमध्ये असणार्या हॉटेल ज्ञानराज ऍण्ड लॉजिंगमध्ये लॉजिंग खोल्यांचा वापर कुंटणखाना करिता असून त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत
COMMENTS