भोर ! आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचा बोर्ड विरोधकांनी फाडला : १३ जणांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
स्मशानभूमीच्या विकास कामाचा आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचा रेडियमचा बोर्ड विरोधकांनी संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवून फाडून टाकल्याने कर्णावड ता.भोर येथील १३ जणांवर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.याची फिर्याद शनिवार दि-१३ रात्री उशिरा सरपंच तानाजी नारायण कुडपणे यांनी दिली.
           भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णावड ता.भोर गावच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या लोकार्पण व भूमीपूजनाचा कार्यक्रम शनिवार दि-१३ आयोजित केला होता.यावेळी विरोधकांनी स्मशानभूमीच्या विकास कामाचा रेडियमचा बोर्ड सार्वजनिक शांतता भंग करीत खोडून व फाडून टाकुन नुकसान केले आहे.तर अपमान करण्याच्या हेतूने स्मशानभूमाच्या भिंतीवरील नावांवर हिरवा रंग फासून नाव पुसून टाकले.या कारणावरून आरोपी तुकाराम पालवे,योगेश मोरे,शामराव आंबवले,,शंकर पालवे,संजय मोरे,मारुती मोरे,लक्ष्मण मोरे,शंकर जाधव,विजय मोरे,राजू गिरे, शिवाजी कुडपणे,भरत कुडपणे,दत्तात्रय आंबवले सर्व रा.कर्नावड ता.भोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

                                               
To Top