बारामती ! आंबी खुर्द येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Pune Reporter


सोमेश्वर रिपोर्टर टीम  - - - - 
बारामती  

बारामती तालुक्यात आंबी खुर्द येथे कऱ्हा नदीपात्रातील गट न २५ अवैध(चोरुन) वाळू उपसा करताना मिळून आला यावेळेस  ७ सात ब्रास वाळू अंदाजे २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  या अवैध वाळू उपसाप्रकरणी आंबी खुर्दचे गाव कामगार तलाठी  रमेश जगदाळे यांनी फिर्याद दिली असुन 

दिनांक १३ डिसेंबर च्या मध्यरात्री व १४ डिसेंबरच्या पहाटे आंबी खुर्द या गावातील क-हा नदीपात्रालगत गटनंबर २५ मध्ये अवैधरीत्या चोरून वाळूचा उपसा चालू होता  .या वेळेस आरोपी स्वप्नील मोंडकर राहणार उरुळी देवाची यांनी बेकायदा बिगर परवानगी शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता ट्रॅक्टर व ट्रॉली याच्या साहाय्याने अनाधिकृतपणे ५७ ब्रास वाळू उत्खनन करून त्यापैकी ७ ब्रास वाळू किंमत २८०००रु ची चोरी करून पर्यावरणाचा हास होईल असे कृत्य करताना मिळून आले म्हणून याबाबत गावकामगार तलाठी रमेश जगदाळे यांनी फिर्याद दाखल केली असून  बारामती कोर्टाकडे रवाना करण्यात आला असून पुढील गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार वाघोले करत आहेत
To Top